सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड :  भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर(BJP MP Pratap Patil Chikhlikar) यांना आंदोलन चांगलचं महागात पडलं आहे. भाजपच्या(BJP Protest) आंदोलनात पुतळ्याला आग लावताना खासदार चिखलीकरांचा हात भाजला आहे. नांदेडमध्ये(Nanded) हे आंदोलन सुरु असताना अचानक आगीचा भडका उडाला. मात्र, कार्यकर्त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध व्यक्त केला आहे. यासाठी नांदेडमध्ये भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करत असताना पुतळ्याला आग लावताना आगीचा भडका उडाला. यात भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हात भाजला. चिखलीकर यांच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.


 पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधना विरोधात नांदेडमध्ये भाजपने निदर्शने केली. यावेळी भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आग लावत असताना अचानक आगीचा भडका उडाला. 


भडका उडाल्याने चिखलीकर यांच्या हातावरील कपड्याने पेट घेतला. जवळ उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आग विझवली आणि चिखलीकर यांना घटनास्थापासून बाजूला घेतले. या घटनेत चिखलीकर यांचा हात किरकोळ भाजला गेला. मात्र, अचानक घडलेल्या घटनेमुळे आंदोलन स्थळी एकाच गोंधळ उडाला. घोषणाबाजीकरत भाजपने हे आंदोलन आवरते घेतले. 


दरम्यान, शिंदे - फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत  महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला आहे.