भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचं कोरोना बाबत अजब वक्तव्य
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात.
सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. पण आता उदयनराजे यांनी केलेल्या एका वक्तव्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
गेल्या जवळपास दीड वर्षांपासून राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) इशारा दिला असून सावधनता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
असं असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे. 'कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार आहे' कोणी जाणार जरी म्हटलं तरी कोरोना जाणार नसल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरती साठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं. यावेळी उदयनराजे यांनी अचानक आंदोलनस्थळी भेट देवून मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केलं
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 40 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के आहे.