खासदार उदयनराजे यांचं ईडीला थेट या शब्दात चॅलेंज, म्हणाले हिंमत असेल तर.....
भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udaynraje Bhosale On Ed) यांनी संताप व्यक्त करत ईडीला थेट आव्हानच दिलंय.
सातारा : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते हे ईडीच्या (Enforcement of Directorate) रडारवर आहेत. अनेक नेत्यांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. काहींना समन्स बजावलं आहे. या धाडसत्रांमुळे तसेच अनेक कारणांमुळे ही केंद्रीय तपास यंत्रणा चांगलीच चर्चेत आली आहे. या ईडीवरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udaynraje Bhosale On Ed) यांनी संताप व्यक्त करत ईडीला थेट आव्हानच दिलंय. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, असं थेट आव्हानच उदयनराजे यांनी दिलंय. उदयनराजेंनी आज (14 ऑक्टोबर) कोल्हापुरातल्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Bjp Mp Udayanraje Bhosale take challenge to Government agency Enforcement Directorate)
उदयनराजे काय म्हणाले?
"कारवाई करु नये, असं माझं म्हणंन नाही. ज्यांच्याकडे टीका करण्यासाठी भरपूर वेळ असतो, ज्यांच्याकडे करण्यासारख्या इतर गोष्टी नसतात, त्यांच्यावर ईडीने कारवाई करावी. मी केव्हाही ओपन आहे, मला काय फरक पडतोय. जसं पेरलं तसं उगवतं. यांनी काय केलंय हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. मी यावर काय बोलणार", अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.
ईडीच्या कारवाईमागे भाजपचं षडयंत्र?
ईडीकडून आतापर्यंत अनेक नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमागे भाजपचं षडयंत्र असल्याचं अनेकदा म्हंटलंय गेलंय. तसेच भाजप या केंद्रीय तपास यंत्रणेचा राजकीय सूडबुद्धीतून वापर केला जात असल्याचा सूर आवळला जातोय. या मुदद्यावरुनही उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "कोणीही असू देत, मी सर्वांची यादी देतो. सोयीने एकमेकांचं झाकायचं आणि काढायचं, बास्स झालं राजकारण" अशा शब्दात प्रतिक्रिया देताना राजेंनी भाजपलाही घरचा आहेर दिलाय.