भाजपला हवा आहे, आणखी एक `सदाभाऊ`?
आणखी एक मंत्रीपद देऊ, अशी अप्रत्यक्ष ऑफर चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापूर : भाजपला आणखी एक 'सदाभाऊ' हवे आहेत, असं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्यावरून दिसतं. भाजपचे मित्रपक्ष मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेला एकमेव राज्यमंत्रीपद दिलं असताना, आता आणखी एक मंत्रीपद देऊ, अशी अप्रत्यक्ष ऑफर चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींना चुचकारण्याचा प्रयत्न करताना, कोल्हापूरमध्ये म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एनडीएमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्यास राज्यात त्यांना आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार सुरु आहे.’
सदाभाऊंची पाठराखण करताना, चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांचं काम चांगलं आहे आणि ते सध्या मुख्यमंत्री कोट्यातून मंत्री आहेत.