मुंबई : मराठवाड्याच्या प्रश्नांवर राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे आज (सोमवारी) लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्या उपोषण करतील. पंकजा यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे हे सुद्धा या उपोषणात सहभागी होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द पंकजा मुंडे यांनीच ट्विट करत याविषयीची माहितीही दिली. 'मराठवाड्यात पाण्याची वणवण संपवून समृद्धीची सत्ता स्थापना व्हावी यासाठी माझं उपोषण एक लक्षवेधी प्रयास आहे!! उपोषण आक्षेपासाठी नाही अपेक्षांसाठी आहे. मागील, ५ वर्षे प्रयत्न झाले, पुढेही व्हावेत आणि होतील ही रास्त अपेक्षा आहे, आपण ही साथ दयावी', असं ट्विट त्यांनी केलं होतं.  



वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी


 


मराठवाड्यातील दुष्काळमुक्ती तसंच येथील ठप्प योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात यासाठी हे उपोषण त्या करत असल्याची चर्चा आहे. मराठवाडय़ातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्रपणे एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून या उपोषणादरम्यान करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेत्यांकडून मागणी करण्यात येणारा निधी हा नेमका कोणत्या सिंचन प्रकल्पासाठी आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.