मुंबई : विधानसभा निव़णुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपाच्या शिर्डी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार, राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज अधिकृत असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विखे पाटलांच्या उमेदवारी अर्जाबाबत काँग्रेसचे शिर्डीचे उमेदवार सुरेश थोरात यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. विखेंच्या नोटरी अधिकाऱ्याचं नुतनीकरण झालं नसल्याचा आक्षेप यात नोंदवण्यात आला होता. 


मात्र नोटरी अधिकाऱ्याचं नुतनीकरण २०२१ सालापर्यंत झालं असल्याचं विखेंनी सिध्द केलं. त्यावरुन त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला. मात्र, हा निकाल अधिकाऱ्यांनी दबावाखाली दिला असल्याचं सांगत या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं काँग्रेस उमेदवार सुरेश थोरात म्हणाले. तेव्हा आता विखेंच्या वाटेतील या अडचणी आणखी वाढणार की, त्यांची वाट मोकळी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


#Assemblyelection2019