MP Shrikant Shinde : कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) वाद विकोपाला गेलाय. भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपच्या इतर स्थानिक नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या (MP Shrikant Shinde) विरोधात दंड थोपटले आहेत. दबावात गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत थेट श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला आव्हान दिल्यामुळे उद्विग्न झालेल्या श्रीकांत शिंदेंनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. स्वार्थापोटी युतीत कुणीतरी मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप श्रीकांत शिंदेंनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात मोदींचं सरकार (Modi Government) यावं हेच आपलं ध्येय असल्याचंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत हे आपलं ध्येच आहे, देशातील तमाम जनेतचाही तसा निर्धार आहे. पण डोंबिवलीमधल्या काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारण सुरु असून शिवसेना-भाजप युतीत (Shivsena-BJP Alliance) मिठाचा खडा टाकला जात आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत (Loksabha Election 2024) कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून कुणाला उमेदेवारी द्यायची हा निर्णय युतीतले वरिष्ठ नेते घेतील. मला कोणत्याही पदाची लालसा नाही, ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी आम्ही एकदिलाने प्रचार करुन त्याला विजयी करु, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय.


केंद्रात भाजप-शिवसेना युती आणि मित्र पक्षाचं सरकार स्थापन व्हावं यासाठी आम्ही काम करत आहोत. पण याला कुणाचा विरोध असेल आणि युतीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मी पदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. 


काय आहे नेमका वाद?
पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कल्याण मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी भाजपची एक बैठक झाली. यात बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारने केंद्रात 9 वर्ष पूर्ण केल्याच्यानिमित्ताने अभिनंदनाचा ठराव मांडला, याला भाजप पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी पोलीस निरीक्षक शेखर बगाडे यांच्या बदलीची मागणी  करत, बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसाठी काम न करण्याचं तसं कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा प्रस्ताव मांडला. बैठकीत एकमाताने हा ठराव पारित करण्यात आला. रविंद्र चव्हाण यांनीही आपण कार्यकर्त्यांच्या भावन जपणार असल्याचं सांगितलं.


यावर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वार्थापोटी युतीत कुणीतरी मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप केला. तसंच पदाच्या राजीनामा देण्याचा इशाराही दिला. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातंय.