मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदरमध्ये देखील शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्त्ये भिडले आहेत. गेल्या आठवड्याभरातली ही तिसरी घटना आहे. भाजप नगरसेविका आणि शिवसेनेची  महिला पदाधिकारी आपसात भिडल्या आहे. कीटकनाशक फवारणीवरून दोघांमध्ये हा वाद झाला. ज्यामुळे भर रस्त्यात लोकप्रतिनिधींचे भांडण लोकांना पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा भाईंदर शहरातील शिवसेना व भाजप पक्षातील वाद नेहमी सारखा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  शिवसेना महिला पदाधिकारी तेजस्वी पाटील  व भाजपच्या नगरसेविका नयना म्हात्रे या दोघांमध्ये आपल्या प्रभागात कीटकनाशक फवारणी वरून वाद झाला. हा वाद शाब्दिक बाचाबाचीत शिवीगाळी पर्यंत पोहोचला होता. 


भाजप नगरसेविका नयना म्हात्रे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसेना उपशहर संघटक तेजस्वी पाटील यांनी केला आहे. भाईंदरच्या मुर्धे गावातील रेव आगर परिसरात दोघींमध्ये तुफान भांडण झाले. तेजस्वी पाटील यांनी पालिकेस  कीटकनाशके फवारणीसाठी दिलेल्या पत्रानंतर पालिकेने फवारणी केली त्यावरून  भाजप नगरसेविका नयना म्हात्रे भडकल्या होत्या. 


भर रस्त्यात दोघींमध्ये झालेल्या भांडणाचा प्रकार मोबाईल मध्ये चित्रित झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून हास्यास्पद प्रतिक्रिया उमटत असून  पुन्हा एकदा  दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.


शिवसेना (ShivSena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते याआधी सिंधुदुर्गमध्ये आमने-सामने आले होते. शिवसेनेच्या पेट्रोल वाटप कार्यक्रमावरून सेना-भाजपमध्ये वाद  झाला . तर 16 जून रोजी अयोध्येतील राममंदिर जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांना भिडले होते. भाजप कार्यकर्ते शिवसेनाभवन समोर आंदोलनाला जात असताना हा राडा झाला होता.