सोलापूर : महानगरपालिकेत भाजपने वर्चस्व अबाधित राखले आहे. महापौर आणि उपमहापौरपद निवडणूक भाजपने जिंकली आहे. महापौरपदी श्रीकांचन यंन्नम तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची निवड झाली आहे. राज्यात महाविकासआघाडी असताना सोलापुरात मात्र महाविकासआघाडीने महापौरपदासाठी उमेदवार दिलाच नाही. उलट शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मतदान केले. त्यामुळे भाजपच्या यंन्नम यांना ५१ मते पडली.  भाजपची संख्या ४९ असताना ५१ मते मिळालीत. शिवसेनेने पाठिंबा देत आपली दोन मते भाजपच्या पारड्यात टाकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमआयएमच्या शहजादा बानो शेख यांना ८ मते पडली. उपमहापौरपदासाठी महाविकासआघाडीने उमेदवार देऊन भाजपसमोर आव्हान उभे केले. पण उपमहापौरपदही भाजपकडे राहिले. राजेश काळेंना ५० मते पडली. तर  काँग्रेसच्या फुरदोस पटेल यांना ३४ मतं  पडली. १०२ नगरसेवक असलेल्या सोलापूर महापालिकेत भाजपचे ४९ नगरसेवक आहेत.   


सोलापूर महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. भाजपकडून श्रीकांचन यन्नम यांना एमआयएमच्या शहजिदा बानो शेख यांनी आव्हान दिले होते. मात्र भाजपने बाजी मारली. महापौर पदासाठी भाजप कडून श्रीकांचन यंन्नम, महाविकासआघाडीकडून शिवसेनेच्या सारिका पिसे, काँग्रेसकडून फुरदोस पटेल, एमआयएमच्या शहजीदा बानो शेख या चार जणांचे सात अर्ज दाखल झाले होते.