उल्हासनगर : उल्हासनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपकडून जमनादास पुरसवानी आणि सेनेच्या लीलाबाई अशान यांचा समावेश आहे. उपमहापौरपदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजप-शिवसेना सरळ लढत झाल्यास टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं उल्हासनगरची महापौरपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप आणि साईपक्ष सत्तेत आहेत. भाजपकडून जमनादास पुरस्वानी मैदानात असताना साई पक्षाचे उमेदवार जीवन इदनानी यांनी देखील अर्ज भरल्याने आता नवीन पेच निर्माण झाला आहे.


रिपाइं आठवले गटाचे भगवान भालेराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत गंगोत्री यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून विजय पाटील आणि साई पक्षाकडून टोनी सिरवानी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.