पुणे : पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ पाहिला मिळाला. पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. 


महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या वैशाली नागवडे आणि राष्ट्रवादीच्या इतर महिला कार्यकर्त्याां बालगंधर्व मंदिर घुसून घोषणाबाजी करत होत्या. यावेळी भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. पण त्याचवेळी वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली.


वैशाली नागवडे यांना कानशिलात लगावण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्या एका भगवी टोपी घातलेल्या कार्यकर्त्यांनी वैशाली नागवडे यांच्यावर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


त्याआधी स्मृती इराणी यांचा ताफा बालगंधर्वच्या बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचा आणि काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं.