नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी भाजपच्या तंबूत असलेले शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलिकरांना भाजपने ऊमेदवारी दिली आहे. नांदेड लोहा विधानसभेचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलिकर हे कट्टर अशोक चव्हाण विरोधक आहेत. जिल्ह्यातील अशोक चव्हाण विरोधकांना एकत्र आणण्याचे कसब चिखलिकरांमध्ये आहे. सध्या चिखलीकर भाजपच्या तंबूत आहेत. याचाच फायदा घेत भाजपने काँग्रेस विरोधात नांदेडमध्ये चिखलिकरांना उमेदवारी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे नाराज होते. पण मातोश्रीवारी करून चिखलिकरांनी नाराजी दूर केली. माणूस मोठा आहे म्हणून निवडणूक मोठी होत नाही. पक्षाने केलेलेया विकासकामावर आपण निवडून येणार, असा विश्वास चिखलिकरांनी व्यक्त केला. ऊद्धव ठाकरे यांची भेट घेल्याने शिवसेनाही आपल्याला पूर्ण ताकदीने मदत करेल, असेही चिखलिकर म्हणाले. आता येत्या काळात चव्हाण चिखलिकर सामना चांगलाच रंगणार आहे.