COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे: विधानपरिषदेच्या रिक्त ११ जागांच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून ठाण्यातील कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांचं नाव आघाडीवर  आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड ते कोकण किनारपट्टीत एकूण ७६ मतदारसंघात कोळी समाजाची निर्णयाक मतं असून त्यातील किमान ४५ ते ५० जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती आखली आहे. त्यात मुंबईचे गावठाण, मच्छिमार समाजाच्या समस्या, सीआरझेड अशा विविध विषयांवर लढणारा भाजपला चेहरा हवा आहे.


दरम्यान,  काँग्रेसकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर झाले आहेत. डॉ. वजाहत मिर्झा आणि शरद रणपिसे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. रणपिसे सध्या विधानपरिषदचे आमदार असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मिर्झा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान शिवसेनेनंही विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. अॅडव्होकटे अनिल परब आणि मनीषा कायंदे यांची नाव निश्चित असून, त्यांची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.