ठाणे : उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचा पराभव करत गतवेळच्या पराभवाचं उट्टं काढलं आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी कुमार आयलानी यांचा अवघ्या अठराशे मतांनी पराभव केला होता. तर या निवडणुकीत ज्योती कलानी यांना एकोणीसशे मतांनी मात देत कुमार आयलानी यांनी २०१४ च्या पराभवाची परतफेड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योती कलानी यांच्या पराभवामुळे कलानी कुटुंबाचं राजकीय भवितव्य संपुष्टात आल्याची चर्चा उल्हासनगर शहरात सुरु झाली आहे.