नागपुरात मिळणारी ही काळी इडली सोशल मीडियावर व्हायरल - व्हीडिओ पाहा
नक्की कशी लागते ही काळी इडली...
अमर काणे, झी २४ तास, नागपूर : तुम्ही पांढरी इडली अनेकदा खाल्ली असेल. पण कधी काळी इडली पाहिली आहे का? नागपुरात एका फूडस्टॉलवर कुमार रेड्डी या प्रयोगशील इडली विक्रेत्याने केलेली काळी इडलीची सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे...या इडलीच्या स्टॉलवर काळी इडली खाण्यासाठी लोकांची गर्दी असते... रेड्डी यांनी संत्र्याची साल, नारळाचे आवरण यांना वाळवून, भाजून त्याची भुकटी तयार केली...भुकटीचा वापर करत काळी इडली तयार केली आहे... कुमार रेड्डी 100 विविध प्रकारच्या इडली बनवतात. सध्या त्यांची काळी इडली सर्वत्र चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून काळ्या इडलीची चर्चा आहे. फक्त नागपुरातचं नाही तर परदेशातही काळी इडली चर्चेत आहे.नागपूरच्या वॉकर स्ट्रीट परिसरात हा स्टॉल आहे. सकाळ, संध्याकाळ ही इडली खाण्यासाठी खवय्यांची एकचं गर्दी जमलेली असते.
ही इडली तयार करताना रेड्डी यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतली. त्यांनी विषेश म्हणजे संत्र्याची साल, नारळाचे आवरण यांपासून तयार केलेल्या इडलीचा कोणच्या आरोग्यावर परिणाम तर होणार नाही ना... या सर्व गोष्टींचा आभ्यास करत त्यांनी खवय्यांसाठी काळी इडली तयार केली.
ही इडली पाहिल्यानंतर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल. त्यामुळे तुम्हाला देखील काळी इडली खायची असेल तर नागपूरला नक्की जा.. आणि ही काळी इडलीची नक्की खा...