चंद्रपूर : थरार ताडोबाच्या जंगलात. येथील काळा बिबट्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. मात्र, या बिबट्याच्या शिकारीची हालचाल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईच्या सिद्धेश मुणगेकर यांनी शिकारीचा हा थरार आपल्या कॅमेऱ्यात टिपला. काळा बिबट्या. बच्चे कंपनीच्या भाषेत सांगायचं तर बघीरा. ताडोबाच्या जंगलाची शान. ताडोबाच्या जंगलात ऐटीत फिरणारा आणि तमाम पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारा हा बिबट्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा बिबट्या असा दबा धरून बसतो की, कारण तो शिकार करण्याच्या बेतात आहे. त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावर उभी आहे त्याची शिकार. एक छोटंसं सांबर. खरं तर सांबरानं या शिकाऱ्याला पाहिले आहे. दोघांचीही नजरानजर झाली. भेदक शिकारी आणि भेदरलेलं सांबर. 


आता पुढं काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. शिकारी शिकार करणार? काळ्या बिबट्या या छोट्या सांबराचा घास घेणार? बराच वेळ त्यानं सावजाचा अंदाज घेतला आणि अखेर एकदाची झडप घातली. पण बिच्चारा शिकारी. त्या छोट्या सांबराने त्याला हुलकावणी दिली आणि बघीराचा शिकारीचा हा प्रयत्न फसला.