वसई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक सुरु आहे. कित्येक जिल्ह्यांमध्ये लसीनंतर ऑक्सिजन, बेडचा तुटवडा भासू लागला आहे. परंतु त्यासोबतच औषधांचा तुटवडा देखील भासू लागला आहे.  अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना काही दिवसांपासून रेमडिसिव्हर औषध उपलब्ध होत नव्हते. मात्र, राज्य सरकारने दखल घेत  रेमडिसिव्हर उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी चढा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. जेणेकरुन काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले. आता अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. जमतेम साठा असल्याने आता यात काळाबाजार (black market of oxygen ) होत असल्याची बाब पुढे आली आहे. वसईतील ( Vasai ) सिटी केअर हॉस्पिटलने (City Care Hospital) धक्कादायक खुलासा केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्सिजनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप  या रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.सिटी केअर हॉस्पिटलने काळाबाजार होत असल्याचे म्हटले आहे. ऑक्सिजनची चढ्या भावाने विक्री होत आहे. वसई विरारमधील कोविडवर उपचार देणाऱ्या रुग्णलायत ऑक्सिजनचा मुबलक साठा असल्याचा दावा जरी महापालिकेच्या आरोग्य  विभागाकडून करण्यात येत असला तरी मात्र, सत्य परिस्थिती काही वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. 


 वसईतल्या सिटी केअर रुग्णालयाच्या संचालकांनी त्यांच्या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. वसई विरारमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पुरवठादारांकडून चढ्या भावाने विक्री करन सुद्धा वेळेत दिला जात नाही. ही बाब गांभीर्याची असून पुढचे 5 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे  रुग्णलायचे डॉक्टर चिंतेत सापडले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने कोविडवर उपचार घेत  असलेल्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रेमडिसिव्हर नंतर आता ऑक्सिजनच्याबाबतीत काळाबाजाराची बाब पुढे आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


दरम्यान, नाशिकमधील नाशिकमध्ये अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना काही दिवसांपासून रेमडिसिव्हर औषध उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे काही रुग्णांचे नातलग आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले होते. तर दुसरीकडे  मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला 140 ऑक्सिजन सिलेंडर प्राप्त झाले आहेत. यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा  मिळाला आहे. रात्री १ वाजेपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा  शिल्लक होता.