नागपूर : नागपुरातही न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पोलिसांना मोठा बंदोबस्त राहणार आहे. तब्बल चार हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी उपराजधानीत तैनात राहणार आहे. शहरात 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार असून काही ठिकाणी आजपासून नाकाबंदी  सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्डी गोवारी उड्डाणपुल ,कमाल टॉकिज उड्डाणपुल, मेंहंदीबाग उड्डाणपुल,जरीपटका मार्टीननगर पुलावर दुतर्फा सर्व प्रकारच्या वाहतूकीस आज संध्याकाळी 6 पासून उद्या सकाळी 6 पर्यंत बंद राहणार आहे.तर लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौक दरम्यानची दोन्ही बाजुचे मार्ग सर्व वाहतुकीस बंद राहणार आहे. शिवाय फुटाळा तलाव परिसरात सर्व वाहतुकीस बंद राहणार आहे. 


मद्यप्राशन करून वाहन चालवणारे आणि भरधाव वेगानं गाडी चालविणा-यांविरुद्ध वाहतूक पोलिसांची विशेष मोहिम राहणार आहे. नाईट कर्फ्यु कायम असल्यानं रात्री 11 नंतर बाहेर फिरणा-यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.