मुंबई : बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी आता नवी खुशखबर.  राज्य कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम करणार्‍या पोलिसांना सरकारनं नवं गिफ्ट दिलं आहे. 


नवे बॉडी प्रोटेक्टर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांसाठी आता नवे बॉडी प्रोटेक्टर आले आहेत. या नव्या प्रोटेक्टरमुळे पोलिसांच्या अंगावरील वजन कमी होणार आहे. लाईट वेट बॉडी प्रोटेक्टरमुळे पोलिसांना कर्तव्य निभावताना काहीसा दिलासा मिळेल.


हिवाळी अधिवेशनात विधीमंडळावर येऊन धडकणाऱ्या मोर्चांना सामोरं जाताना हे बॉडीप्रोटेक्टर पोलिसांना काहीसा दिलासा देतील. मुख्यमंत्र्यांनी आज या बॉडी प्रोटेक्टर्सची पाहणी केली. नागपुरात पोलिसांना 600 बॉडी प्रोटेक्टर देण्यात आलेत.