नागपूर :  नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश दाराजवळ असलेल्या ट्रॅफिक पोलीस चौकीच्या मागे जिवंत बॉम्ब सदृश वस्तू सापडली आहे. बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएसने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्युज करण्यासाठी नेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहिती प्रमाणे बॉम्ब सदृश वस्तूमध्ये एक छोटे डेटोनेटर आणि लो intensity च्या स्फोटकांचा 55 छोट्या कांड्या एकमेकांशी सर्किट ने जोडलेल्या स्वरूपात होते. 


बीडीडीएस ला प्राथमिक दृष्ट्या ते जिवंत बॉम्ब सारखे वाटल्यामुळे सध्या ती बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ताब्यात घेऊन बीडीडीएस च्या खास गाडीमध्ये  नेण्यात आली आहे.


संध्याकाळी सातनंतरच्या सुमारास ही बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या मुख्य दारा जवळील ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे तार ने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर आधी पोलिसांनी त्याची पाहणी केली, ती वस्तू इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या स्वरूपात असल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. 


मुख्य दारावर तसेच मुख्य दाराच्या समोरील रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने ते ताब्यात घेऊन गेले. दरम्यान डेटोनेटर आणि त्यासोबत सर्किटने जोडलेल्या त्या कांड्या किती घातक होत्या हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.