Anil Deshumukh :  राष्ट्रवादीसाठी (Nationalist Congress) आजचा दिवस डबल धमाका दिवस ठरला आहे, कारण आज शरद पवार (Sharad Pawar)यांचा वाढदिवस आणि त्यातच अनिल देशमुख ( Anil Deshumukh Bail) तब्बल 13 महिन्यांनी दिलासा मिळाला आहे. कथित 100 कोटी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले होते त्यानंतर जामीन की जेल असं सुनावणीदरम्यान प्रश्न असायचा. अखेर अनिल देशमुखांना (Anil Deshmukh Hearing Update) जामीन मिळाला आहे. ईडीने ज्या प्रकरणात त्यांना अटक केली होती त्या प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात. 


कधी झाली होती अटक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीकडून (Anil Deshmukh Money Laundering Case) अटक करण्यात आली होती. 



काय आहे नेमकं प्रकरण?


सचिन वाझेकडून (Sachin Vaze) गृहमंत्री (Maharashtra's former home minister Anil Deshmukh) असताना दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी करण्याचे असा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Paramveer Singh) यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रात त्यांनी अनिल देशमुखांवर हा आरोप केला आहे. यानंतर सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर नोंदवला होता. याच आधारावर ईडीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली. (Bombay HC grants bail to NCP leader Anil Deshmukh money laundering case latest marathi news)



गृहमंत्री असताना देशमुख यांनी बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4.7 कोटी उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही रक्कम डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत जप्त करण्यात आली असून ही रक्कम मुंबई पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सचिन वझेमार्फत वसूल करण्यात आली होती.ईडीनुसार, या रक्कामेपैकी 4.18 कोटी रुपये दिल्लीतील 4 वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले होते.


 


हेसुद्धा वाचा - Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर


 


या प्रकरणाचीही चौकशी 


देशमुख यांनी पत्नी आरती देशमुख यांच्या नावे मुंबईतील (Mumbai) वरळीमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट 2004 मध्ये रोख रक्कम देऊन खरेदी करण्यात आला होता, परंतु अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना फेब्रुवारी 2020 मध्ये विक्री करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. ईडी या प्रकरणाचाही तपास करत आहे.