Chhota Rajan: मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी गँगस्टर छोटा राजन याला मोठा दिलासा दिला आहे. 2001मध्ये उद्योगपती जया शेट्टीच्या हत्या प्रकरणात छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं होतं. 30 मे 2024 रोजी विशेष मकोका कोर्टाने राजनसह अन्य लोकांना दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला जामीनासाठी एक लाख रुपयाच्या दंड भरण्याचे आदेश देण्यात आला आहे. मात्र, छोटा राजनवर इतर गुन्ह्यांची नोंद असल्याने तो जेलमध्येच राहणार आहे. याआधी मेमध्ये एका विशेष कोर्टाने हॉटेल व्यवसायिकेच्या हत्या प्रकरणात छोटा राजनला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजनने शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गँगस्टरच्या मागणी होती की, शिक्षेला स्थगिती देण्यात यावी आणि त्याला जामीन देण्यात यावा. 


कोण आहे छोटा राजन?


मुंबईतील चेंबुरमध्ये राहणाऱ्या राजेंद्र सदाशिव निखळजे याला अंडरवर्ल्डने छोटा राजन असं नाव देण्यात आलं होतं. राजेंद्र सदाशिवने शाळा सोडल्यानंतर चित्रपटांची तिकिट ब्लॅकने विकण्याचा धंदा सुरू केला आणि नंतर तो राजन नायरच्या गँगमध्ये सामील झाला. राजन नायरला बडा राजन असं म्हटलं जातं होतं. राजनेने एका मुलीच्या प्रेमाखातर गँग सुरू केली. मात्र नंतर त्याच मुलीने त्या गँगमधील अब्दुल कुंजूसोबत लग्न केले. त्यानंतर बडा राजन आणि कुंजूची दुश्मनी झाली आणि कुंजूने बडा राजनची हत्या केली. 


छोटा राजन दाउद इब्राहिमच्या संपर्कात आला आणि दोघांनी दीर्घकाळापर्यंत मुंबईत दहशत माजवली. दाऊदने छोटा राजनला त्याच्या गँगमध्ये सामील केले आणि छोटा राजनने मुंबईत दाऊदच्या नावाची दहशत पसरवली. 


जया शेट्टी कोण आहे?


मध्य मुंबईच्या गावदेवीमध्ये गोल्डन क्राउन हॉटेलची मालक जया शेट्टीला 4 मे 2001 रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर छोटा राजनच्या गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली.