श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळच्या दिग्रस इथले हजारो कुटुंबीय निसर्गाच्या प्रकोपाने उघड्यावर आले आलेत... विशेषतः पुरामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय  उघड्यावर पडलेले संसार... घरातलं अन्नधान्य, कपडे, भांडीकुंडी, पैसा सारंच पुरात वाहून गेलं... डोळ्यादेखत सारं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं. यवतमाळ जिल्ह्यात ही परिस्थिती आहे.


विद्यार्थ्यांना फटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे दिग्रस धावंडा नदीला पूर आला. निसर्गाच्या प्रकोपानं सारं काही हिरावून तर घेतलंच. मात्र या पुराचा सगळ्यात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसतोय. दप्तर, पुस्तकं, गणवेश सगळंच पुराच्या पाण्यात वाहून गेलंय. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय.


घरकुलांत भ्रष्टाचार 


दरवर्षीच दिग्रसच्या संभाजीनगर भागाला पुराचा धोका असतो. पावसाळ्यात चार महिने ग्रामस्थांना धाकधूक असते. त्यामुळेच निवाऱ्याचा प्रश्न मिटवा अशी मागणी पूरग्रस्त करतायत. २००५ च्या पुरानंतर ९५२ घरकुलांसाठी कोट्यवधी रुपयांची योजना मंजूर झाली. मात्र यांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय.


शिक्षणावर परिणाम


घरकुलांअभावी पावसाळ्यात ग्रामस्थांना नदीच्या काठावरच जीठ मुठीत घेऊन राहवं लागतंय. मात्र लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे पावसाळ्यात हाल होतात. याचा सर्वाधिक परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतोय.