मुंबई : पुण्यातील कोंढवा परिसरात एका अभियंता तरूणाने आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यामुळे या तरूणाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. ऋषीकेश मारूती उमाप असं या २९ वर्षीय तरूणाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांकडे या प्रकरणी तपास सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषीकेशचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत, तर त्याला एक भाऊही आहे, जो बंगळुरूमध्ये नोकरी करतो. सध्या तो पुण्यातच कुटुंबासोबत राहत आहे.


आज सकाळी ऋषीकेशने दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा ऋषीकेशने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबत कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली. 


पोलिसांनी तातडीने ऋषीकेशला ससून रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये ऋषीकेशची नोकरी गेली. त्यामुळे तो अनेक दिवसांपासून नैराश्येत होता. याच दरम्यान त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचेही व्यसन लागले. 


त्यामुळेच नोकरी गेल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पुढील तपासही सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्या २-४ महिने प्रत्यक्ष कामासाठी बंद होत्या. वर्क फ्रॉम होममुळे आणि विविध सेवा-सुविधांवरील निर्बंधामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत.