Maharashtra News : हिवाळ्याला सुरूवात झाली असून आता घराघरामध्ये गरम पाण्याचे हिटर लावले जात आहेत. मात्र काहीवेळा हेच हिटर तुमच्या जिवावर उठताना दिसत आहेत. कारण हिटरमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. जळगावमधील एरंडोल इथल्या 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यश उर्फ साई वासुदेव पाटील असे या मृत मुलाचे नाव आहे. 
 
नेमकं काय घडलं?  
यश हा अंघोळीसाठी गेला होता मात्र तो आतमध्ये गेल्यावर लवकर बाहेर आला नाही. घरच्यांना वाटलं यश जास्त वेळ अंघोळ करत असावा मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने संशय आला. शेवटी त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा पाहतात तर काय यश हा बेशुद्ध अवस्थेत पडला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यश अंघोळ करत असताना गिझरमधून गॅसची गळती झाल्याचं घरच्यांना दिसून आलं. त्यानंतर घरच्यांनी यशला लगेच खासगी दवाखान्यात दाखल केल. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासत मृत घोषित केले. या घटनेमुळे एरंडोल येथे खळबळ उडाली आहे. 


एकीकडे थंडीपासून बचावासाठी आपण गॅस गिझर लावत आहोत. ज्या ठिकाणी गिझर बसवणार आहात त्या ठिकाणी एक खिडकी असायला हवी. जेणेकरून गिझर लीक झाली तर खिडकी उघडता यावी. त्यासोबतच गिझर हा अडचणीच्या ठिकाणी नसावा.