नागपूर: भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संस्थेतील एका कर्मचाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. निशांत अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निशांतच्या प्राथमिक चौकशीदरम्यान तो हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील महिलेच्या बनावट फेसबुक प्रोफाईलशी चॅटिंगद्वारे त्याने ही माहिती लीक केल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. 


उत्तर प्रदेश एटीएसकडून अशा घडामोडींवर बारीक नजर ठेवण्यात येत होती. यापूर्वी अशा प्रकरणात अटकेची कारवाई झालेल्या बीएसएफ जवानाच्या चौकशीदरम्यान आणखी दोन संशयास्पद बनावट फेसबुक अकाऊंट असल्याची माहिती समोर आली होती. 


हे बनावट अकाऊंट महिलांच्या नावे बनवण्यात आले असून ते पाकिस्तानातून चालवण्यात येत होते. या महिलेशी निशांत अग्रवाल चॅटिंग करीत असल्याचे स्पष्ट झाले.


त्यामुळे आता निशांतच्या डीआरडीओ युनिटमध्ये वावरण्यामुळे देशाचे नेमके काय नुकसान झाले आहे, याचा अंदाज घेऊन पुढची कारवाई होणार आहे.