मुंबई : एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी  त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ४ लोकांना विविध अवयव देऊन त्यांना नविन जीवनदान दिले गेले. मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका रिलीझमध्ये असं सांगण्यात आलं की, एक व्यक्ती काम करत असताना खूप गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री साडे सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


चार लोकांना मिळाले जीवनदान
 



कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार मृत व्यक्तींच्या शरीरातील अवयव काढण्यात आले. त्यानंतर लगेचच मृत व्यक्तींचे हृदय ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात आलं. तिथे एक ५६ वर्षांची व्यक्ती डाइलेटेड कार्डियोमायोपंथी आजाराने त्रस्त झालेली होती. त्या व्यक्तींचे ऑपरेशन करण्यात आले.


अवयव दानाने मिळाले नवे जीवन


 


ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अजून दोन व्यक्तींचे यकृत आणि किडनीचे ऑपरेशन करण्यात आले. त्याची एक किडनी ही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तींच्या ऑपरेशनसाठी पाठवण्यात आली. निवेदनानुसार त्यांची त्वचा आणि डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि डोळे हे बँकेत पाठवण्यात आले.