प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर : आजपासून अहमदनगर जिल्हयातील सर्व व्यवसाय पुर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र साई मंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय  झाला नसल्याने  शिर्डीतील साईमंदिर दर्शनासाठी खुले झाल नाही आहे.  साई मंदीरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साईमंदीर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लॉकडाऊनमुळे हार-फुल विक्रेते, हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 


करोनाचे राज्यात रुग्ण वाढू लागल्यानंतर 5 एप्रिल साईबाबांच मंदीर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आल. साई मंदीरातील दैनंदीन पूजा विधी सुरु आहेत. आता लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर इतर शहरं तशीच गावे पुर्वपदावर येतात मात्र शिर्डीचे समिकरण हे वेगळ आहे.साईमंदिर खुले असेल तरच भाविक शिर्डीला येतात आणि त्यानंतर व्यवसायाला गती मिळते. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत त्यामुळे  अनलॉक झाल तरी मंदीरच खुल नसल्याने व्यवसाय सुरू करून उपयोग नाही अशी अवस्था आहे.


शिर्डीवर आसपासचे शेतकरी शिर्डीतील हॉटेल्स हातावर काम करणारी अनेक लोक, हार फुल प्रसाद विक्रेते, रेस्टॉरंट अश्यांची आर्थिक गणित गेल्या नऊ आणि आताच्या अडीच महीण्याच्या लॉकडाऊनमुळे बिघडलेल आहे.  त्यामुळे साईमंदिर खुले करावे ही मागणी जिल्ह्यातील निर्बंध शिथील झाल्यानंतर जोर धरू लागली आहे.


अहमदनगर जिल्हयातील सर्व व्यवसाय 7 जुन 2021 पासुन सुरू होणार असल्याची माहीती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आदेश जारी केले. मात्र मंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईमंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी शिर्डीकरांनी केली आहे.


दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लॉकडाऊनमुळे हार-फुल विक्रेते, हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर साईमंदिर 5 एप्रिल पासुन भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दैनंदिन पुजा आणि आरती सुरू आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर इतर शहरं तशीच गावे पुर्वपदावर येतात मात्र शिर्डीचे समिकरण हे वेगळ आहे. साईमंदिर खुले असेल तरच भाविक शिर्डीला येतात आणि त्यानंतर व्यवसायाला गती मिळते.मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत, आणि पर्यायाने अनलॉक झाले तरी व्यवसाय सुरू करून उपयोग नाही अशी अवस्था आहे.


कोरोनाच्या संकटात एका वर्षात साईबाबा संस्थानचे उत्पन्न घटले आहे. सरासरीच्या 30 टक्के दान गेल्या वर्षभरात प्राप्त झाले आहे.साईंच्या नगरित एक हजारांहून अधिक हॉटेल्स आहेत. शेतकरी, हातावर काम करणारे, हार फुल प्रसाद विक्रेते, रेस्टॉरंट हे देखील अडचणित आले आहेत. हॉटेल चालकांना बँकेकडून हप्त्याचा तगादा सुरू आहे. सध्या मेंटेनंन्स देखील परवडत नाही, त्यामुळे साईमंदिर खुले करावे ही मागणी जिल्हयातील निर्बंध शिथील झाल्यानंतर जोर धरू लागली आहे.


लॉकडाऊनमध्ये  जवळपास एक वर्षे  मंदिर बंद आहे . मंदिर खुले कराव अशी आमची मागणी आहे गेल्या वेळी आंदोलन कराव लागल होत आताही मॉल उघडली मग मंदीरे का नाहू त्या साठी  आमच्यावर  आंदोलन करण्याची वेळ येवु देवु नये, अशी माहिती हार प्रसाद विक्रेते रवी गोंदकर यांनी दिली.


शिर्डीत एक हजाराच्या आसपास छोटे मोठे हॉटेल्स आहे. हॉटेल बंद असली तरी खर्च मात्र सुरू आहे. सर्वांची मानसिक अवस्था बिघडली आहे. हॉटेल चालकच नव्हे तर त्यावर अवलंबून असणा-या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील मोठा आहे. जोपर्यत साई मंदिराची दारे उघडत नाही तोपर्यंत शिर्डीतील आर्थिक घडी रुळावर येणार नाही, अशी माहिती हॉटेल व्यवसायिक अशोक गोंदकर यांनी दिली.