मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणखी 4 ते 5 आमदार हे शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती मिळते आहे. हे आमदार नेमके कोण आहेत. याची माहिती अजून पुढे आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यात आणखी 4 ते 5 आमदार आल्यास ही संख्या 40 पर्यंत जावू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. शिवसेनेतील मोठे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. पण पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिले नाही. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला नाही. अखेर आज त्यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं.


एकनाथ शिंदे यांच्या भेटीला काही शिवसेनेचे 2 नेते पोहोचले आहेत. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप ते एकनाथ शिंदे यांना देणार आहेत. त्यामुळे यानंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात आज भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाने कारवाई केलीये. त्यांना गटनेते पदावरुन हटवण्यात आलं आहे. 


एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती शिवसेना आमदार आहेत. यावर सगळं गणित अवलंबून आहे. शिंदे यांनी जर एक चतुर्थांश आमदार फोडून नवीन आमदारांचा ग्रुप बनवला तर त्यांना अधिकृतपणे मान्यता मिळेल आणि त्यांचं आमदार पद देखील कायम राहिल. पण तसं झालं नाही तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.