Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आता उद्यापासून साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. सोबतच, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असेही जरांगे यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे यांनी महिलांच्या हातून पाणी पिऊन उपोषण सोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत येऊन आंदोलन करण्याची आक्रमक भाषा करणारे मनोज जरांगे आज मात्र काहीसे नरमले आहेत. त्यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय. उद्यापासून अंतरवालील साखळी उपोषण केलं जाणारंय. उपचारासाठी डॉक्टरांना सहकार्य करणार असून कार्यकर्त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मात्र सग्या सोय-यांसाठी आपलं आंदोलन सुरूच राहिल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 


मनोज जरांगे  आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहेत. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मागे आलोय. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कुणीही कितीही दबाव आणला तरी मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलं. अजूनही वेळ गेलेली नाही आज अधिवेशनात सगेसोयरेची अंमलबजावणी करा अशी विनंती जरांगेंनी केलीय. शिंदे, फडणवीसांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेऊ नये...मराठ्यांची नाराजी शिंदे, फडणवीसांना परवडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.


जरांगेंच्या उपोषणावरून फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिल आहे. जरांगेंचा बोलावता धनी कोण आहे हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोधावं. फोन टॅप करणा-या रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचा अनुभव आहे. त्यामुळे फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का? हे तपासावं असं आव्हान राऊतांनी दिलंय. 


जरांगे राजकीय भूमिका मांडत असतील तर त्याला प्रत्युत्तर द्या - भाजपच्या बैठकीत नेत्यांना सूचना


जरांगे राजकीय भूमिका मांडत असतील तर त्याला प्रत्युत्तर द्या, असे आदेश भाजपच्या बैठकीत देण्यात आलेत. मात्र प्रत्युत्तर देताना संयम बाळगावा, सामाजिक तेढ वाढेल अशी वक्तव्यं नको, अशा सूचना देण्यात आल्यायत. जरांगेंनी काल फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर या सूचना करण्यात आल्यायत. भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत फडणवीसांकडून मतदारसंघाचा आढावाही घेण्यात आला. 


जरांगेंचा सर्वांसमोर तमाशा, फडणवीसांवर अभद्र टीका- बारस्करांचा हल्लाबोल


जरांगे मागे फिरले पण तणाव कायम! जालना, बीडची बॉर्डर बंद; 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित; एसटीलाही ब्रेक