नाशिक : मुंबईहुन सकाळी 11.30 वाजता नाशिककडे निघालेल्या जयनगर एक्स्प्रेसला नाशिकजवळ अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.30 वाजता 11061 LTT-जयनगर एक्स्प्रेस सुटली. दुपारी तीनच्या दरम्यान ही एक्स्प्रेस नाशिकजवळील देवलाली येथे आली असता Dn मार्गावर अचानक रुळावरून दहा डब्बे घसरले.


 



एक्स्प्रेस गाडीला झालेल्या या अपघातात अद्याप कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे समजते. या अपघाताचे वृत्त कळताच अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. 


या अपघातामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक हे विस्कळीत झालं आहे. काही गाड्यांचं मार्ग वळवण्यात आला आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


रद्द करण्यात आलेल्या गाड्या


मनमाड पंचवटी एक्सप्रेस - अप - डाउन कॅन्सल 
मुंबई -अदीलाबाद  नंदीग्राम एक्सप्रेस - रद्द 


मार्ग वळवण्यात आलेल्या गाड्या


सीएसएमटी - निजामुद्दीन राजधानी  एक्सप्रेस  - वसई रोड जळगाव भुसावळ मार्गे वळवण्यास आली आहे 
सीएसएमटी हावडा दुरान्तो एक्सप्रेस - वसई रोड जळगाव भुसावळ मार्गे वळवण्यास आली आहे 
एलटीटी प्रतापगड उद्योगनगरी एक्सप्रेस - लोणावळा पुणे दौड मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे. 


अपघातामुळे परिणाम होणाऱ्या ट्रेन 


निजामउद्दीन मंगला एक्सप्रेस 
जालना जनशताब्दी एक्सप्रेस 
जबलपूर गरीबरथ 
वाराणसी एक्सप्रेस 
एलटीटी गोरखपूर समर स्पेशल