Breaking News : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची आत्महत्या
ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आला. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dahisar Firing Abhishek Ghosalkar : दहिसर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती सोमर आली आहे.
हेसुद्धा वाचा : कोण आहेत अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाईशी संबध काय?
मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या गोळीबारानंतर मॉरिस भाईनेही स्वत:वर चार गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाने उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. तेव्हा दहिसरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे.
हेसुद्धा वाचा : Abhishek Ghosalkar Death : चार मिनिटांचं फेसबुक लाईव्ह, 'ती' चार वाक्य आणि... मॉरिसच्या संशयास्पद हालचाली उघड