शाहू छत्रपती यांचा मोठा गौप्यस्फोट : संभाजीराजे यांनी `अपक्ष` लढावं ही फडणवीसांची खेळी
२००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यापुढील त्यांची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. त्यांनी कुठलेही निर्णय घेताना मला किंवा छत्रपती घराण्याला विचारले नाही.
कोल्हापूर : शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवार ( Sanjay pawar ) यांचे नाव जाहीर झाले. यावेळी मी स्वतः फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार जे अनेक वर्ष पक्षासाठी झटत होते त्यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम शिवसेनेने ( Shivsena ) केले त्याचा आनंद आहे असे मत संभाजीराजे ( Sambhajiraje ) यांचे वडील शाहू छत्रपती ( Shahu Chtrapati ) यांनी व्यक्त केले.
२०१६ मध्ये संभाजीराजे ( Sambhajiraje ) यांनी राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठी आमचा विरोध होता. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यापुढील त्यांची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. त्यांनी कुठलेही निर्णय घेताना मला किंवा छत्रपती घराण्याला विचारले नाही.
असे असतानाही त्यांच्या निर्णयाला कधीही विरोध केला नाही. त्यांनी आतापर्यंत घेतलेले जे निर्णय आहेत ते त्यांचे व्यक्तिगत निर्णय आहेत. एखादी राजकीय संघटना काढून त्यांना पुढे जायचे असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. त्यांना राजकारण जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठीच त्यांनी पक्ष स्थापन केला. त्यासाठीच त्यांना खासदारकी हवी होती असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस ( Devendr Fadnvis ) यांच्या भेटीनंतर संभाजीराजे यांनी 'स्वराज्य' ( Swarajya ) संघटना काढली असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा अन्य पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोनच पर्याय संभाजीराजे यांच्याकडे होते. आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही, असा खुलासा त्यांनी केला.
राज्यसभेच्या सहाव्या जागेमधून संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) यांनी दिलेला शब्द मोडला असा गंभीर आरोप संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर विरोधकांनीही हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याची टीका केलीय.
त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संभाजीराजे यांनी वैयक्तिक निर्णय घेतला. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असे म्हणता येणार नाही. तसेच, शिवसेनेने दिलेला शब्द फिरवला असंही म्हणता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.