Budget 2021 : Gold आणि Silver वरील निर्णयानंतर व्यापारी आणि ग्राहकांची प्रतिक्रीया
शुल्क कपातीमुळे सोने आणि चांदी काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता
वाल्मिकी जोशी, झी मीडिया, जळगाव : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सर्व सामन्यांनाच्या जवळचा सोने आणि चांदी याबाबत एक मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी सोने, चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी करण्याची घोषणा केली आहे. शुल्क कपातीमुळे सोने आणि चांदी काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यात सोन्याचांदीच्या खरेदीवर कस्टम ड्युटी अडीच टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. म्हणजे जळगावच्या सुवर्णनगरी मध्ये सोन्याचे आजचे भाव 49 हजार 900 रुपये प्रतितोळे आहे.
सोन्या चांदी वरील ड्युटी कमी केली आहे त्यामुळे सोन्याच्या भावात प्रति तोळा हजार ते बाराशे रुपयांची कपात अपेक्षित असल्याचे जळगावच्या सोने व्यापारी सुनील बाफना यांनी यावेळी सांगितले.
आज केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्या चांदी विषयी जो बजेट जाहीर केला आहे त्यात कस्टम ड्युटी अडीच टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे यामुळे सोन्या-चांदीच्या दरात जवळपास जवळपास हजार ते बाराशे रुपये मी कमी झाले पाहिजे.
सकाळी जेव्हा विदेशी मार्केट उघडले त्यावेळी डॉलरची किंमत ही 1848 रुपये होती परंतु बजेट जाहीर झाल्यानंतर ती किंमत 1865 रुपये झाले आहे. विदेशी बाजाराला ओपन व्हायला अजून वेळ असला तरी भारताचे आर्थिक बजेट सादर झाल्यामुळे त्यांनी आपले भाव अगोदरच वाढवून दिलेले आहे त्यामुळे सोन्याच्या भावात किती फरक पडेल हे अजून सांगता येत नसल्याचे सागर भंगाळे यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात सोन्याच्या भावात खूप वाढवून 58 हजार झाले होते. त्यावेळी सोन्यात गुंतवणूक सामान्य नागरिकांना करता आली नाही परंतु केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना याचा नक्की फायदा होईल असे ग्राहक पूनम पाटील यांनी सांगितले.