पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर हजर झाले. पत्नीसह डीएसके चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते.  


रोज लावणार हजेरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीएसकेंनी ७ ते १२ फेब्रुवारी दरम्यान दररोज चौकशीसाठी हजर राहावं. असे आदेश उच्च न्यायालयाने पाच फेब्रुवारी रोजी दिले आहेत. त्यानुसार डीएसके अकरा ते एक या वेळेत चौकशीसाठी हजर होते. 


डीएसकेंची चौकशी


आर्थिक गुन्हे शाखेकडे डीएसकेंच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीएसकेंची चौकशी केली. डीएसकेंबरोबर त्यांचे वकील देखील आले होते.