अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : मुंढव्यातील केशवनगरमध्ये एक दुमजली इमारत कोसळून दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत घरातील कुटुंबासह काही जण ढिगाऱ्याखाली अडकले. शनिवारी दुपारी १२. ३० च्या दरम्यान ही घटना घडली. अग्निशामक दलाकडून आत्तापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलंय. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


एक लहान मुलगी आतमध्ये अडकली असून काही जनावरे अडकलेले आहेत. त्यांना बाहेर बाहेर काढण्याचे काम चालू आहे. आणखीही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोसळलेली इमारत जुनी होती. महापालिकेकडून रहिवाशांना नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती मिळतेय. 


ही इमारतीचं बांधकाम खूप जुनं असून महानगरपालिकेने यापूर्वी त्यांना घर खाली करण्याची नोटीसदेखील दिलेली होती. सर्व जखमी इसमांना शासकीय रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात हलवण्यात आलंय.