मुंबईनंतर आता कल्याण येथे इमारत कोसळी, एकाचा मृत्यू
Building collapsed at Kalyan : कल्याण रामबागमध्ये इमारत कोसळली. या अपघातात दोघे गंभीर झाले असल्याची माहिती आहे.
ठाणे : Building collapsed at Kalyan : मुंबईतील कुर्ला येथे इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला. आता कल्याण येथे एक मजली इमारत कोसळली. कल्याण रामबागमध्ये इमारत कोसळली. या अपघातात दोघे गंभीर झाले असल्याची माहिती आहे. तसेच दोन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान,रुग्णालयात उपचार सुरु असतांना एकाचा मृत्यू झाला आहे.
रामबागमध्ये एक मजल्याची इमारत कोसळली. एक कुटुंब या इमारतीत राहत असल्याची माहिती आहे. ढिगाऱ्यातून दोन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर या दुर्घटनेत दोघेही गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रामबाग एक परिसरातील रामबाग लेन मधील तळअधिक एक मजला असलेले चाळ टाईप घर कोसळले. घरात दोघे अडकले होते. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना दोघांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती चिंताजंक आहे. सूर्यभान काकड, उषा काकड हे जखमी झालेत. दोन मुली आणि एक मुलगा नातेवाईकांकडे झोपायला गेल्याने ते वाचले आहेत.
रुग्णालयात उपचार सुरु असतांना सूर्यभान काकड याचा मृत्यू झाला आहे. तर महिला उषा काकड यांच्यावर कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.