मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाण्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात या बोकडावर लाखोंची बोली लावली जातेयं. बुलढाणा जिल्ह्यातील करवंड  गावातील हा रुबाबदार टायगर अशी त्याची ओळख आहे. उंच पुरा टर्रेबाज गडी, मोठं कपाळ, मजबूत बांधा असं त्याचं वैशिष्ट्य आहे.या बोकडाची ताकद तर एवढी आहे, की दोन-तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या बोकडाची सध्या सगळीकडे हवा आहे. या राजबिंड्या टायगरला  पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे या टायगरवर लाखोंची बोली लागली नसती तर नवलच. कारण त्याच्या रुपापेक्षाही जन्मत:च त्याच्या पाठीवर  उमटलेली अल्लाहची खूण. या खुणेमुळेच मर्सिड़ीजलाही लाजवेल एवढ्या किमतीची बोली त्याच्यावर लागली आहे. अशी खूण असलेली जनावरं ज्यांच्याकडे असतात त्यांना  नशीबवान समजण्याची धारणा आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील बाजारात टायगरला विक्रीसाठी आणलं होतं.यावेळी त्याच्यावर 11 लाखांपासून बोली लागली. ही बोली वाढता वाढता थेट 51 लाखांपर्यंत येऊन पोहोचली.  बोकडाला एवढा भाव मिळतो म्हटल्यावर मालकाला ही आता आपल्या टायगरला 1 कोटींची बोली लागावी अशी अपेक्षा आहे.


त्यामुळे आता मालकाची ही इच्छा पुर्ण होणार का याकडेच गावकऱ्यांच्या नजरा लागल्य़ा आहेत. लखपती असलेल्या या टायगरवर कोटींची बोली लागणार का? कोण ठरणार  टाय़गरचा नशीबवान मालक याचीच सध्या बुलढाण्यात चर्चा आहे.