बुलडाणा: कोणी आपल्या प्रेमासाठी तर कोणी बायकोला कंटाळून उचापत्या करत असतात. मात्र एक तरुणाच्या विरूगिरीनं तर बुलडाणा पोलिसांनाही दमछाक आणली. बुलडाण्यात एका तरूणाच्या विरूगिरीमुळे सगळी यंत्रणा कामाला लागलीय. बुलढाणा शहराच्या मध्यभागी असलेल्या बीएसएनएल टेलीफोन टॉवरवर तरूण चढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या टॉवर तरुण चढला होता तो टॉवरच जवळपास 350 फूट उंच आहे.  त्यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या तरूणाची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र हा तरूण ऐकायला तयार नव्हता.


 ड्रोन पाठवून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. हा तरूण नेमका कोणत्या कारणामुले टॉवरवर चढला हे देखील समजू शकलेलं नाही. गेल्या वर्षी याच टॉवरवर एक मद्यधुंद व्यक्ती चढली होती आणि आता हे प्रकरण समोर आलं आहे. 


बीएसएनएलच्या या टॉवरवर जाण्यासाठी मार्ग सोपा असल्यानेच परत एकदा हा प्रकार घडलाय त्यामुळे चिंता व्यक्त होते आहे. गेल्या तासभरापासून पोलीस प्रशासन सदर व्यक्तीला खाली उतरण्यासाठी विनंती करत आहे.