`मा**** संजय राऊत, तू याच्यानंतर...` Sanjay Gaikwad यांची जीभ घसरली!
Sanjay Gaikwad On Sanjay Raut:संजय राऊतांना माध्यमांसमोरच आईवरून शिवी देत गायकवाडांनी असभ्य भाषेत टीका केलीय. त्यानंतर आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.
Sanjay Gaikwad: शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं आहे. संजय राऊतांना माध्यमांसमोरच आईवरून शिवी देत गायकवाडांनी असभ्य भाषेत टीका केलीय. त्यानंतर आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. (Buldhana MLA Sanjay Gaikwad tongue slips abuses sanjay raut directly maharastra politics)
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. अमिताभच्या दिवार सिनेमात जसा मेरा बाप चोर है हा डायलॉग आहे, त्याप्रमाणे शिंदे गटावर गद्दारीचा शिक्का असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देतांना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली.
काय म्हणाले Sanjay Gaikwad ?
आमच्यावर गद्दारीचा आरोप लागणार नाही. आम्ही तर क्रांतीचा उठाव केल्याचा अभिमान पुढच्या पिढीवर लागणार आहे. मा**** संजय राऊत, तू याच्यानंतर अशी भाषा वापरू नको. जनतेला आमचा निर्णय मान्य आहे, असं वक्तव्य संजय गायकवाड (Sanjay Gaikwad abuses Sanjay Raut) यांनी केला आहे.
तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली होती, ती महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. आम्हाला शिवसेना आणि भाजप म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं. आमच्या किती जागा महाराष्ट्रात येणार हे आम्ही दाखवून देऊ, बघ तू तुझा पक्ष किती भूईसफाट करतो ते, असं थेट आव्हान संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलंय.
दरम्यान, संजय राऊतांना (Buldhana MLA Sanjay Gaikwad) आईवरून शिवी देत त्यांनी संताप व्यक्त केला. आधीच राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहेत. त्यात अशा प्रकारे आमदारच शिवीगाळ करू लागले तर इतरांनी त्यांच्याकडून कोणता आदर्श घ्यायचा हाच सवाल आता उपस्थित होतोय.