संतापजनक ! वाळू माफियांच्या ट्रकने पोलिसाला चिरडले
बुलडाणा : वाळू माफियांची मुजोरी सुरु आहे. खामगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे.
बुलडाणा : वाळू माफियांची मुजोरी सुरु आहे. खामगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना वाळू माफियांकडून वाळू उपसा करण्यास येत आहे. दरम्यान, वाळू माफियांना अटकाव करणाऱ्या आणि अवैध रेतीचा ट्रक अडवणाऱ्या पोलिसाला चिरडले. या पोलीस कर्मचारी शिरसाठ हे जागीच ठार झाले आहेत.
बुलडाण्यामध्ये वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला वाहनचालकाने उडवले. यात पोलीस कर्मचारी शिरसाठ हे जागीच ठार झालेत. खामगाव तालुक्यातील माटरगाव जवळची पहाटे ही घटना आहे.
दरम्यान, याआधी भंडारा जिल्ह्यात अवैधपणे वाळू तस्करी होत आहे. पवनी शहराला ऐतिहासिक महत्व असले तरीही या ठिकाणी असलेली वैनगंगा नदीमुळे या ठिकाणी उच्च प्रतीची वाळू येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे , त्यामुळे या पांढऱ्या शुभ्र वाळूला नागपूर शिवाय इतरत्र मोठी मागणी असते. अनेकवेळा दिवसा ढवळ्या वाळूची अवैधपणे वाळूची तस्करी होत होती.
आता तर बुलडाणा जिल्ह्यात रात्रीची वाळू तस्करी होत असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. मात्र, वाळू माफियांना कसलाही धाक नसल्याचे दिसून येत आहे. वाळू माफियांमुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.