MLA Sanjay Gaikwad Cacke Cutting Controversy: आपल्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी चक्क तलवारीने केक कापलाय. तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. या तरुणांवर सार्वजनिक ठिकाणी तलवार वापरल्याबद्दल कारवाई करण्यात येते. आमदार गायकवाडांनी केवळ तलवार दाखवलीच नाही तर त्याने केकंही कापला. याही पुढे जाऊन त्यांनी आपल्या लाडक्या लेकाला आणि पत्नीला केकं भरवालादेखील. काय आहे प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  


भल्यामोठ्या तलवारीनं कापला केक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड वाढदिवस होता. या वाढदिवसाची पूर्ण जिल्ह्यात चर्चा होती. सगळीकडे शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर लागले होते. आमदारांच्या चिरंजीवांना भेटायला रांगच रांगा लागल्या होत्या. दरम्यान बुलढाण्यात आमदार पुत्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आमदार गायकवाड, त्यांचे पुत्र, पत्नी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केक समोर आल्यावर आमदार गायकवाडांनी तलवार काढली आणि हातातील भल्यामोठ्या तलवारीनं स्टेजवर सर्वांसमोर केक कापला.


 व्हिडिओ होतोय व्हायरल


यापुढे जाऊन त्यांनी कापलेला केक तलवारीनंच आपल्या पत्नीला भरवला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापला तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते.


मुख्यमंत्री गायकवाडांना समज देणार का?


मात्र आता लोकप्रतिनिधी असलेले संजय गायकवाड यांच्यावर पोलीस कारवाई करणार का? असा सवाल नागरिक विचारतात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना समज देणार का? की त्यांची चूक पाठीशी घालणार? असे प्रश्नदेखील विचारले जात आहेत.


गावगुंडांच्या सुपाऱ्या घेण्याचं काम मातोश्रीवर 


गावगुंडांच्या सुपाऱ्या घेण्याचं काम आणि राजकारण पूर्वीपासूनचं मातोश्रीवरुन चालते. आम्ही घेतलेल्या सुपाऱ्या या महाराष्ट्राला प्रगतीकडं नेणाऱ्या आहेत, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली होती. लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या. शेतकऱ्यांना योजना देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या, असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. हे सुपारीबाज सरकार आहे. सुपारी गँग ही मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसते, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला होता. मातोश्रीवर आंदोलन करणारे आंदोलक हे शिंदे गटाचे असल्याचे सांगताना राऊतांनी ही टीका केली होती.