हेमंत चापुडे / जुन्नर, पुणे : Bull Attack on Police : अंगावर काटा आणणारा हा प्रसंग. रस्त्यावरून जाणाऱ्या वळूने केला पोलीस कर्मचाऱ्यावर पाठिमागून असा काही हल्ला केली की, पोलीस हवेत फेकला गेला. त्यानंतर हवेतून रस्त्यावर धापकन खाली आपटला. या थराराचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पोलीस कर्मचारी रस्त्यावरती आपलं कर्तव्य बजावत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका वळूने या पोलीस कर्मचाऱ्या वरती प्राणघातक हल्ला केला. शांतपणे जाणारा बैल अचानक पोलिसावर हल्ला करतो. त्यानंतर काही सेकंदाच पोलीस कर्मचारी हवेत फेकला गेला आणि रस्त्यावर असा काही पडला की त्याला जागेवरुन उठता आले नाही. तो तसाच पडून होता. त्याचवेळी हल्ला करणारा बैल तेथून शांतपणे जात होता. दरम्यान, काही लोक पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीला धावले. त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला आधार देत रस्त्याच्या बाजूला केले.



 रात्रीच्या वेळी हा पोलीस कर्मचारी रस्त्यावरती आपली ड्युटी करत असताना पाठीमागून येणाऱ्या वळूने या पोलीस कर्मचाऱ्यांला शिंगावरती घेतले आणि हवेत फेकल्यानंतर तो रस्त्यावर पडला. यानंतर हा कर्मचारी पाठीला मार लागलेल्या जागेवरच पडून असताना आजूबाजूला असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने बाजूला केले. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.