बैलगाडी मालकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरु
पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये बैलगाडी मालकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरु झाले आहे.
चाकण : पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये बैलगाडी मालकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरु झाले आहे.
बैलगाडा मालकांनी पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण तळेगाव चौकात बैलगाडे रस्त्यावरती उतरवून आंदोलन सुरु केलं आहे. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहेत.
महामार्गावर हे आंदोलन सुरू असल्याने वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. गेल्या 5 वर्षांपासून राज्यात बैलगाडा शर्यतीवरती बंदी असल्यानं बैलगाडा मालकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे आता सर्व बैलगाडा मालकांसह राजकीय नेतेही रस्त्यावर उतरले आहेत.