Animal Husbandry Department Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच वेळ काढून अर्ज करावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पशुसंवर्धन विभागात आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४६ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 


पशुसंवर्धक, वरिष्ठ लिपिक, लघु लेखक (उच्च श्रेणी), लघु लेखक (निम्न श्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर ही पदे भरली जातील. परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पदानुसार पात्रतेचा तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारतीय नागरीकत्व असावे. उमेदवाराचे वय १ मे २०२३ पर्यंत मोजण्यात येईल. यावेळी उमेदवाराचे कमाल वय १८ वर्षे आणि किमान वय ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक, अनाथ उमेदवारांना ४५ वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. 


परीक्षेचा तपशील


27 जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्राची सविस्तर यादी देण्यात आली आहे. जाहीरातीत नमूद केलेली पद संख्या आणि आरक्षण यामध्ये गरजेनुसार बदल करण्याचा अधिकार शासनाने राखून ठेवला आहे. पदसंख्या व अरक्षणामध्येबदल झाल्यास याबाबतची घोषणा अधिकृत वेबसाइटवर करण्यात येणार आहे. यासोबतच परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण आणि प्रवर्गनिहाय संख्येत बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. 


आरक्षण


खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत आरक्षण देण्यात येणार आहे.


शेवटची तारीख


पशुधन पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या उमेदवारांना १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ९००/- रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २७ मे पासून ही अर्ज प्रक्रिया सुरु असून १६ जून २०२३ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. याआधी ११ जूनपर्यंत अर्ज भरण्यात येत होता. पण आता ही मुदत वाढविण्यात आली आहे.


 


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा