Honeytrap case in Alibag : रायगडच्या ( Raigad) अलिबागमध्ये (Alibag ) आणखी एक हनी ट्रॅप प्रकरणात (Honeytrap case) बंटी बबलीला (Bunty Babli) पुन्हा अटक केली आहे. (Crime News) त्यांनी अनेकांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याची बाब समोर आली. त्यापैकी एकाने मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (Maharashtra News In Marathi)  याप्रकरणी या जोडीला परहूरमधून ताब्यात घेतले आहे.(Bunty Babli arrested in honeytrap case in Alibag )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आठवडयात अलिबागमधील हनीट्रॅप प्रकरणात समोर आलेल्‍या बंटी बबलीच्‍या करामती हळूहळू बाहेर येत आहेत. त्‍यांनी अनेकांना अशाच प्रकारे जाळयात ओढल्‍याची बाब समोर आली आहे. त्‍यापैकीच एकाने मांडवा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्‍हा दाखल करून संजय सावंत आणि धनश्री तावरे या जोडगोळीला पुन्‍हा अटक केली आहे.


या जोडीने परहूर येथील एकाला जागा दाखवण्‍याच्‍या बहाण्‍याने बोलावून जाळयात ओढले. त्‍यानंतर त्‍याच्‍याशी शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ क्‍लीप बनवली. त्याआधारे त्याला ब्‍लॅकमेल करुन सात लाखांची खंडणी उकळली. या जोडीकडून जप्‍त केलेल्‍या मोबाईलमध्‍ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ क्‍लीप्‍स आणि फोटो तसेच चॅटिंग पोलिसांना मिळाले आहेत. या जोडगोळीने अनेक पैसेवाल्‍याना अशाच प्रकारे ब्‍लॅकमेल केले असल्‍याची माहिती आहे.


नाशिक आणि पुण्यातही बंटी-बबलीचा कारनामा


नाशिकमध्ये पायी जाणाऱ्या महिलांचे दागिणे लुटणाऱ्या बंटी बबलीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपींनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर पुण्यात घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 98 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातला पुरुष आरोपी हॉटेल व्यवसायिक आहे तर त्याच्या साथीदार महिलेनं वकिलीचं शिक्षण घेतलंय. कर्वेनगरमधल्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 नोव्हेंबरला त्यांनी घरफोडी केली होती. फॉर्च्यूनर गाडीतून रेकी करुन बंद घरात ते चोरी करायचे. 


दरम्यान,  बनावट सोन्याची बिस्किटं देऊन व्यापाऱ्याला 3 लाखांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. उदयभान पांडे आणि आफ्रिन शेख अशी दोघांची नावे आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातही याआधी एका महिलेने गंडा घातला होता. महागड्या कार स्वस्तात विकत देण्याचं आमिष दाखवून लुटणाऱ्या एका  महिलेला ठाणे पोलिसांनी अटक केली. या महिलेनं मुंबईतल्या अनेकांना स्वस्त कारच्या आमिषानं तब्बल 75 लाखांना गंडा घातल्याचं चौकशीत समोर आले आहे.