कोंडाईबारी घाटात बस पलटी, १ ठार तर २० गंभीर जखमी
नवापूर तालुक्यातील नागपूर-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात रात्री दीडच्या सुमारास वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस घाटात पलटी झाली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
नंदूरबार : जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील नागपूर-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात रात्री दीडच्या सुमारास वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस घाटात पलटी झाली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
बऱ्हाणपूर-सुरत बस मध्यप्रदेश मधील बऱ्हाणपूरहून गुजरात राज्यातील वापी येथे जात असताना नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघात झाला. यात चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. बसमधील २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
रात्र असल्याने बचाव कार्याला अडथळा निर्माण झाला होता लहान बालक व महिला रक्तबंबाळ अवस्थेत अनेक वेळापासून घाटत तळमळत होते.
कोंडाईबारी घाटात महामार्ग पोलिस व स्थानिक लोकांनी घटनास्थळी घाव घेऊन मदत केली. १०८ या शासकीय रुग्णवाहीकेच्या मदतीने जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल केले.
गंभीर जखमीमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात व नंदूरबार जिल्हा रूग्णालयात प्रवाशांना उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.