सातारा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ ट्रॅव्हल्सने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मलकापूर गावच्या हद्दीत डी मार्टसमोर हा अपघात झाला. 


यामध्ये ट्रॅव्हल्सच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. 


या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. उसाने भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ट्रॅव्हल्स पाठीमागून घुसली.


या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. 


त्यांनी कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक महामार्गावरून, सेवा रस्त्यावर वळवली व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.