कोल्हापूर : कोल्हापुरात ऐन मिरवणुकीत केएमटीची बस घुसल्याने झालेल्या अपघातात २ ठार तर ३ जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातल्या पापाची तिकटी परिसरात ही घटना घडली. या परिसरात मोहरमची मिरवणूक सुरु होती. यावेळी बसचा ब्रेक निकामी झाल्याने बस मिरवणुकीत घुसली. या दुर्घटनेत २ जण ठार झाले तर ३ जण जखमी झाले.


या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली. बसवर दगडफेक करण्यात आली.