Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात PMPMLची बस चोरीला गेली आहे. पालखी सोहळ्यामुळे बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्यानं पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती. बसमध्ये चावी असल्याचं पाहून चोरट्यानं चक्क बस पळवून नेली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बस चोरी केल्यानंतर चोरटा बस मार्केट यार्ड परिसरात सोडून पसार झाला. बस चोरल्यानंतर चोरट्यानं बसमधील 5 हजारांची बॅटरी चोरून नेल्याचं उघडकीस आले आहे.  या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


PMPL च्या ताफ्यात 900 नवीन बसेस 


PMPL च्या ताफ्यात 900 नवीन बसेस येणार असल्याची घोषणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितले.  पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेबरोबरच PMRDA देखील खर्चाचा वाटा उचलणार आहे. तर PMPL कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळणार असून जूनपासून अंमलबजाणी होणार आहे.


पुणे महानगर परिवहन महामंडळावर जप्तीची नामुष्की


ठेकेदारांचे पैसे न दिल्याने मालमत्ता जप्तीची नामुष्की, पुण्यातील PMPML म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळावर ओढवली होती. PMPMLच्या मालकीची कोथरूड आणि शिवाजीनगर बसस्थानकातील मालमत्ता जप्तीचे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने दिलेत. यासंदर्भात ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी सोल्युशन या कंपनीने खटला दाखल केला होता. 


पुण्यात PMPMLच्या बसेसची अवस्था बिकट 


पुण्यात PMPMLच्या बसेसची अवस्था बिकट असल्याचे दिसून येत आहे. PMPMLच्या बसचा बीआरटी दरवाजा उघडण्यासाठी बटनाच्या ऐवजी दोरीचा वापर केला जात आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात बसेस रस्त्यावर सुरु करत असताना बसेसच्या दुरुस्तीकडे PMPMLच दुर्लक्ष असल्याचं दिसून येतंय.


पुण्यात PMPML बस चालकाला बेदम मारहाण


पुण्यात PMPML बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आलीय. बसची कारला धडक लागल्याच्या कारणावरून कारचालक महिलेने बस चालकाला मारहाण केली. ही महिला माजी भाजप नगरसेवक असल्याचा दावा शशांक देशमाने या बस चालकाने केलाय. पुण्यातील अभिनव चौकातली भर दुपारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती.